News Details

नाशिक, अहमदनगर, मुंबई उपनगर उपांत्यपूर्व फेरीत
Posted By : Shweta   ,   Posted On : 2017-02-05 16:12:41

Description : चिंचाणीतील के.डी. हायस्कूलच्या मैदानात महाराष्ट्र खो-खो असोसिएशन व पालघर जिल्हा खो-खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या 33 व्या किशोर - किशोरी 14 वर्षांखालील गटाची राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत मुंबई उपनगर, उस्मानाबाद, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, सांगली व पुण्याच्या दोन्ही संघांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. मुंबई उपनगरची कर्णधार साक्षी वाफेलकरच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर मुंबई उपनगरने मुंबईचा 8-4 असा 1 डाव व 4 गुणांनी पराभव केला. साक्षीने संरक्षणात दोन्ही डावात अनुक्रमे 3 मि. व 2 मिनिटे नाबाद वेळ नोंदवली व आक्रमणात संघासाठी 3 गुणांची कमाई केली. साक्षी बरोबरच ग्रीष्मा माईन (3.30 मि. व 2 गडी), साक्षी जाधव (2.20 मि. व 1 गडी) व पूर्वा सरफरेने (1.40 मि. व 1.30 मि.) देखील विजयात मोलाचा वाटा उचलला. मुलांच्या गटात मुंबई उपनगरने यजमान पालघर संघावर 9-4 अशी 1 डाव व 5 गुणांनी मात केली.सिद्धेशने पहिल्या डावात नाबाद 3.40 मि नाबाद तर, दुसर्‍या डावात 4 मिनिटे चांगला खेळ केला. सबज्युनियर गटात गतवर्षी अजिंक्यपद पटकावणार्‍या पुण्याच्या दोन्ही संघानी आपली घोडदौड सुरू ठेवली आहे. उप-उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांत पुण्याच्या मुलींनी पालघर संघावर 7-5 असा 2 गुण व 4.50 मिनिटे राखून पराभव केला. पुण्याच्या सब-ज्युनियर गटातील राष्ट्रीय खेळाडू हर्षदा करे (3.20 मि. व 1.50 मि नाबाद), व साक्षी करे (1.20 मि.,2.20 मि.) व (3 गडी) यांच्या खेळासमोर पालघर संघ हतबल ठरला. पुण्याच्या मुलांच्या संघाने रायगडवर13-2 अशी 1 डाव व 11 गुणांनी मात केली. गतवर्षी भुवनेश्‍वर येथे झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतील महाराष्ट्राच्या संघाचा कर्णधार नाशिकच्या चंदू चावरने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करीत रत्नागिरी विरुद्धचा सामना 10-9 असा 1 गुण व 5.40 मिनिटे राखून एकहाती सामना जिंकून दिला. चंदूने 5.40 मि. व 2.10 मि. खेळ संरक्षण करून आक्रमणात 6 गडी टिपले. नाशिकच्या मुलींनी सोलापूरवर 15-9 अशी 6 गुणांनी मात केली.अहमदनगरच्या किशोर संघाने अत्यंत चुरशीच्या सामन्यात ठाण्याचा 16-15 असा 1 गुण व 40 सेकंद राखून पराभव केला. अहमदनगरच्या मुलींनी लातूर संघाविरुद्धच्या सामन्यात 9-5 अशी 1 डाव व 4 गुणांनी सरशी केली. उस्मानाबादच्या मुलांनी सातारा संघावर 9-8 अशा एका गुणाने विजय मिळवला. औरंगाबादच्या मुलींच्या संघाने गतवर्षीच्या उपविजेत्या ठाणे संघावर 9-7 अशी 1 डाव व 2 गुणांनी मात करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. मुलांच्या संघाने बीड विरुद्धच्या सामन्यात 7-4 असा 1 डाव व 3 गुणांनी विजय प्राप्त करून दिला. सांगलीच्या मुलांच्या संघासमोर मुंबईचा निभाव लागला नाही, सांगलीने 13-7 अशी 1 डाव व 6 गुणांनी मात केली. सांगलीच्या मुलींनी जळगावला 16-5 असे 1 डाव व 11 गुणांनी हरवले. मुलांच्या गटात सोलापूरने धुळ्याचा 14-7 अशा 1 डाव व 7 गुणांनी पराभव केला.

Comments Login For Comment

  • No Comments