News Details

पुण्याच्या नितीन भोईटेचा विक्रमी प्रयत्न
Posted By : Shweta   ,   Posted On : 2017-02-03 14:00:54

पुणे: भारताच्या एका बाजूला जम्मू-काश्‍मिर असून दुसरे टोक कन्याकुमारी येथे संपते. या दोन्ही अगदी विरुद्ध बाजूला असणाऱ्या राज्यांच्या सीमा फक्‍त सायकलवर ओलांडून सर्वात कमी दिवसांमध्ये अंतर पूर्ण करण्याचा नवा विक्रम पुणेकर करणार आहे. पुण्याच्या नितीन भोईटे याने जम्मू-काश्‍मिर ते कन्याकुमारी हे अंतर सायकलवरून केवळ 13 दिवसामध्ये पूर्ण करण्याचा विडा उचलला आहे. त्याच्या या मोहिमेला आजपासून (1 फेब्रुवारी) काश्‍मिर येथून सुरूवात झाली. जम्मू-काश्‍मिर ते कन्याकुमारी असा सुमारे 4150 किलोमीटरचा प्रवास नितीन केवळ 13 दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. आज सकाळी (बुधवार) सकाळी 6 वाजता नितीनने आपल्या मोहिमेचा श्रीगणेशा केला. 32 वर्षीय नितीन आपल्या गिअर सायकलवर एक सपोर्ट गाडी, एक साथीदार व स्पेअर सायकल यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग 44 वरून आपले मार्गक्रमण करणार आहे. काश्‍मिरमधील प्रतिकूल हवामानाचा सामना करत त्याने पहिल्या अर्ध्या दिवसामध्ये लुधियानापर्यंतचा सुमारे 280 किलोमीटरचा प्रवासही पूर्ण केला असल्याची माहिती नितीनचे मित्र तसेच त्याला पाठिंबा देणारे सचिन गांजवे यांनी दिली. नितीनने वर्षभरापूर्वीच या मोहिमेच्या तयारीस सुरुवात केली होती. आपली प्रबळ इच्छाशक्ती आणि कठोर मेहनत आपल्यला या विक्रमी कामगिरीसाठी यश मिळवून देईल, असा त्याला विश्‍वास आहे. नितीनने याआधी वैष्णोदेवी (जम्मू-काश्‍मिर) ते कन्याकुमारी हा प्रवासही सायकलवरून पूर्ण केला होता. यामुळे या विक्रमाचा नितीनला विश्‍वास आहे. याबरोबरच नितीनने पुणे ते चेन्नई (4 दिवस), पुणे-गोवा (3 दिवस, 3 वेळा), अष्टविनायक, पुणे ते कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, मुंबई, बारामती, शिर्डी असा सायकलवरून प्रवास केला आहे. प्रवासाचा मार्ग जम्मू येथे सुरुवात केल्यावर लुधियाना (पंजाब) ते पानिपत (हरयाणा) 225 किमी, पानिपत ते दिल्ली, दिल्ली ते आग्रा (उत्तर प्रदेश), आग्रा ते झाशी (उत्तराखंड), झाशी ते ललितपूर, ललितपूर ते सिओनी, सिओनी ते नागपूर (महाराष्ट्र), नागपूर ते अढिलाबाद, अढिलाबाद ते हैद्राबाद, हैद्राबाद ते बंगलोर (कर्नाटक), बंगलोर ते मदुराई (केरळ), मदुराई ते कन्याकुमारी (तामिळनाडू) असा नितीनचा विक्रमासाठीचा प्रवास राहणार आहे.

Comments Login For Comment

  • No Comments