News Details

महाराष्‍ट्र रेसलिंग चॅम्‍पीयन्स लिगच्‍या संघ मालक निवडीला प्रारंभ
Posted By : Mahakhel.com   ,   Posted On : 2017-01-30 23:14:19

Description : महाराष्‍ट्रातील 36 जिल्‍हयातील 200 मल्‍लाची पुण्‍यात दंगल महाराष्‍ट्र रेसलिंग चॅम्‍पीयन्स लिगच्‍या संघ मालक निवडीला प्रारंभ देशातील कुस्‍तीची कर्मभुमी असलेल्‍या महाराष्‍ट्रातील मल्‍ल खेळाडूंना एका व्‍यासपीठावर आणण्‍याचा आजपर्यंतचा सर्वांत मोठा प्रयत्‍न महाराष्‍ट्र रेस‍लींग चॅम्‍पीयन्स लिगच्‍या माध्‍यमातून होणार असून या लीगमध्‍ये महाराष्‍ट्रातील 36 जिल्‍हयातील 200 मल्‍ल खेळाडूंना आपली कामगिरी आजमावता येणार आहे. कुस्‍तीच्‍या इतिहातील सर्वांत मोठी लिग पुण्‍याच्‍या बालेवाडीत होणार असून या लीगमुळे कुस्‍तीची खरी दंगल अनुभवण्‍याचा योग कुस्‍तीप्रेमींना लाभणार आहे. या लीगसाठी सहा संघ निवडीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. प्रत्येक संघात पाच वजनी गट असतील त्यातील 4 पुरुष खेळाडू तर एक महिला खेळाडूचे असणार आहेत. या संघ मालकीची निवडीची प्रक्रिया सुरु करण्यात आली असल्‍याची माहिती आज दिनांक ३०.०१.२०१७ रोजी आयोजित केलेल्या लिगच्‍या पत्रकार परिषदेत देण्‍यात आली. हि लीग बिलिव्ह मीडिया इंडिया व महाराष्‍ट्र राज्‍य कुस्‍तीगीर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती ऑलम्‍पीक आणि इतर राष्‍ट्रीय आतंरराष्‍ट्रीय स्‍पर्धांमधे कुस्‍तीला मिळालेले यश देखणे असले तरी अजुन कुस्‍तीच्‍या क्षेत्रात प्रचंड मोठी कामगिरी करण्‍याची कुवत महाराष्‍ट्रातील मल्‍ल खेळाडूमध्‍ये आहे. महाराष्‍ट्रातील 36 जिल्‍हयातील अशा गुणवंत मल्‍ल खेळाडूंना सहा संघाच्‍या माध्‍यमातून महाराष्‍ट्र रेसलींग चॅम्‍पीयन लिगच्‍या मैदानात आपली गुणवत्‍ता आजमावता येणार आहे. ठाणे, पुणे, औरंगाबाद, नागपुर,नाशिक, कोल्‍हापुर असे 6 संघ असणार आहेत. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद व ठाण्‍यातील पुष्‍कराज केळकर यांच्‍या संकल्‍पनेतून जन्‍माला आलेल्‍या या लीगच्‍या आयोजनात बिलीव्‍ह मिडीया इंडिया कंपनीतील त्‍याचे सहकारी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्‍यात आली. यावेळी महाराष्‍ट्र राज्‍य कुस्‍तीगीर परिषदेतचे कार्याध्‍यक्ष नामदेवराव मोहिते, परिषदेचे सरचिटणीस व ऑलिम्पिक असोसिएशनचे उपाध्‍यक्ष बाळासाहेब लांडगे, परिषदेचे उपाध्‍यक्ष सर्जेराव शिंदे, परिषदेचे उपाध्‍यक्ष व ऑलिम्पिकवीर मारूती आडकर, परिषदेचे उपाध्‍यक्ष व अर्जुन पुरस्‍कारप्राप्‍त काका पवार, कार्यालयीन चिटणीस ललित लांडगे,तांत्रिक चिटणीस व आंतराष्‍ट्रीय पंच दिनेश गुंड आंतराष्‍ट्रीय सुमो कुस्‍ती पंच व प्रशिक्षक राष्‍ट्रीय खेळाडू चंदशेखर शिंदे, आदी मान्‍यवरांच्‍या उपस्थितीत या लिगची अधिकृत घोषणा करण्‍यात आली. या लिगसाठीच्‍या संघ मालक निवडीच्या प्रक्रियेच्या शुभारंभाची अधिकृत घोषणा देखील यावेळी करण्‍यात आली. संघ मालक होण्यासाठी इच्छुकांनी पुष्‍कराज केळकर 9930988814, मिलिंद सबनिस 7710830116, चंदशेखर शिंदे 9892841070 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Comments Login For Comment

  • No Comments

Related News