News Details

मॅरेथॉनला पुणेकरांचा उत्साही प्रतिसाद
Posted By : Shweta   ,   Posted On : 2017-01-30 15:15:13

पुणे: हौषी पुणेकरांच्या उत्साही प्रतिसादात आज पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. नोटबंदीमुळे डिसेंबर महिन्यातील पहिल्या रविवारी होणारी पुणे मॅरेथॉन नवीन वर्षातील जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यात घेण्यात आली. परंतु मॅरेथॉन स्पर्धेच्या उत्साहात आणि जल्लोषात कुठेही कामतरता दिसून आली नाही. वास्तविक पाहता शर्यतीच्या वेळी थंडीचे प्रमाण अधिक असेल असे अंदाज वर्तविण्यात आले होते. त्यामुळे शर्यतीची वेळ कमी नोंदविली जाईल. परंतु प्रत्यक्षात थंडीचे प्रमाण कमी होते. दरम्यान अनेक वर्ष महाराष्ट्र ऍथलेटिक्‍स संघाची सेवा करणारे प्रल्हाद सावंत यांचा आगळ्या वेगळ्या पद्धतीने गौरव करण्यात आला. प्रल्हाद सावंत गौरव पुणे मॅरेथॉन असे स्पर्धेला नाव देण्यात आले होते. दरवर्षी प्रमाणे पुण्यासह राज्यभरातील आणि सैन्यदलातील धावपटूंनी मॅरेथॉनला हजेरी लावली. यामध्ये अपेक्षेप्रमाणे इथोपिया व केनया येथील आंतरराष्ट्रीय धावपटूंनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. मात्र स्पर्धेवर पुन्हा एकदा परदेशी खेळाडूंचे वर्चस्व पाहायला मिळाले. स्पर्धेतील फुल मॅरेथॉन ही मुख्य शर्यत सकाळी 5.30 वाजता नियोजित वेळेत सुटली. सत्कारमूर्ती प्रल्हाद सावंत यांनी फुल मॅरेथॉनला झेंडा हिरवा झेंडा दाखविला. यावेळी व्यासपीठावर पुणे विद्यापीठाचे कुलकरू वासुदेव गाढे, अभय छाजेड महाराष्ट्रीय मंडळाचे धनंजय दामले, बालकृष्ण आकोटकर आणि कर्नल राजेश उपस्थित होते. त्यानंतर लगेच 20 मिनिटांनी पुरुषांच्या आणि महिलांच्या अर्धमॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. तर 10 किमी शर्यत 5.50 वाजता सोडण्यात आली. तसेच दिव्यांगांची शर्यत 8 वाजता सोडण्यात आली. दरम्यान सर्व शर्यती सुटल्यानंतर शर्यती सणस मैदानावर परतत असताना धावपटूंचा जल्लोष खऱ्या अर्थाने पाहायला मिळाला. यावेळी शर्यत पूर्ण करून येणाऱ्या धावपटूंची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय टीम देखील सज्ज होती. पहिल्यांदाच मॅरेथॉनमधील सर्व शर्यतींची सुरुवात आणि शेवट सणस मैदानावर करण्यात आला. महाराष्ट्राच्या खेळाडूंसह पुण्यातील विविध क्षेत्रातील धावपटू मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. यावेळी धावपटूंचा आणि क्रीडा प्रेमींचा उत्साह वाढण्यासाठी मैदानावर फ्लॅशमॉबचे आयोजन करण्यात आले होते. डान्स पथकाने उपस्थितांचे आणि खेळाडूंचे मनोरंजन केले. तर महाराष्ट्रीय मंडळाच्या वतीने योगप्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली. या योग प्रात्यक्षिकाचे नेतृत्व आंतरराष्ट्रीय पदक विजेती पल्लवी गव्हाणे हिने केले. देशातील नोटबंदीच्या निर्णायामुळे मॅरेथॉन कॅशलेस करण्यात आली. त्यामुळे स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच विजेत्या खेळाडूंच्या खात्यात बक्षीस रक्‍कम जमा करण्यात येणार आहे.

Comments Login For Comment

  • No Comments