News Details

पुणे मॅरेथॉनवर केनियाचे वर्चस्व
Posted By : Shweta   ,   Posted On : 2017-01-30 15:10:24

पुणे: 31 व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये केनिया, इथिओपियाच्या धावपटूंनी वर्चस्व राखले. केनियाच्या होसेअ किप्रोटिच रुट्टो याने 2 तास 12 मिनिटे आणि 18 सेकंदाची वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला. इथिओपियाचा अड्रेसा केदिर फिगा याने 2 तास 12 मिनिटे आणि 20 सेकंदाची वेळ नोंदवत द्वितीय क्रमांक तर केनियाचा सिमोन किप्रुगत किरुईने तिसरा क्रमांक पटकावत विजय मिळविला. या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सणस मैदानापासून सकाळी साडेपाच वाजता सुरुवात झाली. 42 किलोमीटरच्या या पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेसाठी तब्बल 120 परदेशी धावपटू सहभागी झाले होते. पुरुषांच्या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेवर इथिओपियाच्या धावपटूंनी आपले वर्चस्व राखले. यामध्ये प्रथम क्रमांक चुको कुमा तेरेचा याने 1 तास 2 मिनिट आणि 40 सेकंदाची वेळ नोंदवली. अदाता इबिसा दिन्सिसीसा याने 1 तास 2 मिनिट 54 सेकंदाची वेळ नोंदवत द्वितीय क्रमांक तर हिका वाक्शुमे बुल्चा याने 1 तास 2 मिनिट 55 सेकंदाची वेळ नोंदवित तिसरा क्रमांक पटकावत आपले स्थान पक्के केले. महिलांच्या अर्ध मॅरेथॉन स्पर्धेमध्ये केनियाच्या ग्लाडयास तारुस हिने 1 तास 12 मिनिटे आणि 36 सेकंदाची वेळ नोंदवित प्रथम क्रमांक, इथिओपियाच्या मेसेरेट मेरीने हिने 1 तास 13 मिनिटे 29 सेकंदाची वेळ नोंदवत द्वितीय क्रमांक तर बोन्टु फिटा मेगेरसा हिने 1 तास 16 मिनिटे आणि 17 सेकंदाची वेळ नोंदवत तृतीय क्रमांक पटकावला.

Comments Login For Comment

  • No Comments