News Details

विदर्भाच्या 16 वर्षीय मुलांनी घडविला इतिहास
Posted By : Shweta   ,   Posted On : 2017-01-30 14:51:15

नागपूर : रविवार, 29 जानेवारी हा दिवस विदर्भ क्रिकेट संघटनेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिल्या गेला आहे. विदर्भाच्या 16 वर्षांखालील मुलांनी विजय मर्चंट करंडक जिंकून नवा इतिहास घडविला. बीसीसीआयच्या राष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद जिंकण्याची विदर्भाची ही पहिलीच वेळ होय. विजेत्या विदर्भाला करंडकाशिवाय रोख चार लाखांचा पुरस्कार देण्यात आला. इंदूर येथे रविवारी संपलेल्या अंतिम सामन्यात विदर्भाने उत्तर प्रदेशचा 171 धावांनी धुव्वा उडवून विजेतेपदाला गवसणी घातली. विदर्भाने निर्णायक विजयासाठी उत्तर प्रदेशला 332 धावांचे लक्ष्य दिले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना उत्तर प्रदेशचा दुसरा डाव अवघ्या 160 धावांतच आटोपला. 5 बाद 64 या धावसंख्येवरून सुरूवात करणाऱ्या उत्तर प्रदेशला विजयासाठी 268 तर, विदर्भाला पाच बळींची आवश्‍यकता होती. विदर्भाच्या गोलंदाजांनी अपेक्षेप्रमाणे उपहारापूर्वीच उत्तर प्रदेशचे उरलेले पाच गडी बाद करून ऐतिहासिक विजयावर शिक्‍कामोर्तब केले. मध्यमगती गोलंदाज प्रेरित अग्रवालने 59 धावांत सहा गडी बाद करून विजयात निर्णायक भूमिका वठविली. हर्ष दुबेने 38 धावांच्या मोबदल्यात तीन बळी टिपले. विदर्भाने हे विजेतेपद युवा प्रशिक्षक व माजी रणजी कर्णधार रणजित पराडकर यांच्यासाठी मार्गदर्शनाखाली मिळविले, हे उल्लेखनीय. क्रिकेटपटू म्हणून विदर्भ क्रिकेटची दहा वर्षे सेवा केल्यानंतर पराडकर यांनी गतवर्षी 16 वर्षांखालील संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा हाती घेतली होती. यापूर्वी विदर्भाच्या 19 वर्षांखालील संघाने प्लेट गटात विजेतेपद पटकाविले होते. मात्र, कोणत्याही वयोगटात बीसीसीआयतर्फे आयोजित स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर करंडक जिंकण्याची ही पहिलीच वेळ होय.

Comments Login For Comment

  • No Comments

Related News