News Details

डॉ. आंबेडकर, शिवशक्ती, अमरहिंद, गोलफादेवी उपांत्य फेरीत दाखल
Posted By : Shweta   ,   Posted On : 2017-01-28 13:13:35

Description : वंदे मातरम क्रीडा मंडळ आयोजित कुमार गट कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत डॉ. आंबेडकर, शिवशक्ती, अमरहिंद, गोलफादेवी यांनी प्रवेश केला. डॉ. आंबेडकरविरुद्ध शिवशक्ती व अमरहिंदविरुद्ध गोलफादेवी अशा उपांत्य लढती होतील. लोअर परेल येथील मंडळाच्या पटांगणावर सुरू असलेल्या मुलांच्या उपउपांत्य सामन्यात अमरहिंदने पिंपळेश्वरचे कडवे आव्हान 34-31 असे परतवित उपांत्य फेरीत धडक दिली. निखिल पवार, अक्षय कारकर यांच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर अमरहिंदने पूर्वार्धात 23-06 अशी आघाडी घेतली होती. उत्तरार्धात मात्र पिंपळेश्वरच्या ऋषिकेश कणेरकरने जोरदार प्रतिआक्रमण करीत हि आघाडी कमी करीत आणली. यात त्याला अनमोल सावंत याची छान साथ लाभली. पण संघाचा पराभव काय ते टाळू शकले नाही. डॉ. आंबेडकरने बंडय़ा मारुतीला 32-26 असे नामविले. सुरुवातीपासून सामन्यावर वर्चस्व राखत त्यांनी हा विजय साकारला. डॉ. आंबेडकरकडून अमित आंजर्लेकर, अक्षय आंबोकर तर बंडय़ा मारुतीकडून शुभम चौगुले, गौरव चिंदरकर यांनी उत्कृष्ट खेळ केला. शिवशक्तीने सिद्धीप्रभावर 25-08 असा सहज विजय मिळविला. मध्यांतराला 16-07 अशी आघाडी घेणार्या शिवशक्तीने नंतर देखील सिद्धीप्रभाला डोके वर काढू दिले नाही. विराज सोहनी, रोहन गायकवाड यांच्या चतुरस्त्र खेळाला सिद्धीप्रभाकडे उत्तर नव्हते. सिद्धीप्रभाकडून विवेक मोरे बरा खेळाला. गोलफादेवीने विजय बजरंग व्यायाम शाळेचा 43-17 असा धुव्वा उडविला. मध्यांतराला 16-08 अशी आघाडी घेणार्या गोलफादेवीने नंतर देखील जोशपूर्ण खेळ करीत हा मोठा विजय साकारला. शार्दुल हरचकर, बिपीन सरोज या मोठय़ा विजयाचे शिल्पकार ठरले. विजय बजरंगचा आकाश निकम एकाकी लढला.

Comments Login For Comment

  • No Comments