News Details

नवी मुंबईत आज भारत-इंग्लंड खो-खोचा थरार
Posted By : Shweta   ,   Posted On : 2017-01-28 12:55:22

मुंबई: क्रिकेटमध्ये सध्या चालू असलेल्या भारत-इंग्लंड मालिकेचा बोलबाला असताना खो-खो या देशी खेळातसुद्धा हे दोन संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. या दोन संघांमध्ये होणाऱ्या तीन सामन्यांच्या मालिकेतील सलामीचा सामना शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता कोपरखरणेमधील रा. फ. नाईक विद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. खो-खो खेळाचा जागतिक स्तरावर प्रसार करण्याचे ध्येय बाळगणाऱ्या भारतीय खो-खो महासंघाने गेल्या वर्षी झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पध्रेतील यशानंतर इंदूर येथे तिसऱ्या आशियाई खो-खो स्पध्रेचे यशस्वी आयोजन केले होते. या शृंखलेची पुढची पायरी म्हणजेच युरोपातील इंग्लंडच्या खो-खो संघाचा हा नियोजित भारत दौरा आहे. या मालिकेतील तीन सामने अनुक्रमे नवी मुंबई, अजमेर व दिल्ली येथे होणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव डॉ. चंद्रजीत जाधव यांनी दिली. इंग्लंडच्या संघाचे शुक्रवारी मुंबईत आगमन झाले. संघ – भारत : संकेत कदम, सुरेश सावंत, सुयश गरगटे, हर्षद हातणकर (महाराष्ट्र), अभिनंदन पाटील, डेव्हिड कदम (कोल्हापूर), सारिबीन के.पी.(केरळ), शिवकुमार. एच. एम., रमेश (कर्नाटक), अम्रेश रमेश वेलीप (गोवा), वी. नवीनकुमार (तेलंगण), वी. सरथ कुमार (पुद्दूचेरी), प्रशिक्षक – मयूर पालांडे (महाराष्ट्र, व्यवस्थापक : किशोर पाटील. इंग्लंड : राहुल गोपीनाथ, भाविक वारा, दिलेश पटेल, निकुंज देपाला, निहाल शहा, सचिन सोमा, रोहित हल्दानिया, कुशल शहा, अक्षय देपाला, अ‍ॅरॉन प्रभू, प्रीतेन पटेल, आकाश सुद, विराज पटेल.

Comments Login For Comment

  • No Comments