News Details

पहिली महिला फुटबॉल लीग 28 जानेवारीपासून
Posted By : Shweta   ,   Posted On : 2017-01-26 11:12:25

नवी दिल्ली: अखिल भारतीय फुटबॉल महासंघाकडून (एआयएफएफ) देशात पहिल्या महिला फुटबॉल लीगचे आयोजन होत आहे. ही स्पर्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर २८ जानेवारीपासून १५ फेब्रुवारीपर्यंत होईल. स्पर्धेत ६ संघांचा सहभाग असेल. एआयएफएफचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रीय मंत्री विजय गोयल यांच्या उपस्थितीत मंगळवारी भारतीय महिला फुटबॉल लीगची घोषणा केली. या वेळी ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता महिला कुस्तीपटू साक्षी मलिक आणि एआयएफएफ महिला विंगच्या प्रमुख सारा पायलट यांची उपस्थिती होती. महिला लीगमध्ये जेपीआर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, एजल फुटबॉल क्लब, रायजिंग स्टुडंट्स क्लब, एफसी पुणे, इस्टर्न स्पोर्टिंग युनियन, फुटबॉल क्लब अलापुरा यांचा समावेश आहे.

Comments Login For Comment

  • No Comments