News Details

विराट कोहली ला पद्मश्री पुरस्कार जाहीर
Posted By : Shweta   ,   Posted On : 2017-01-26 10:24:02

Description : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ला पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. क्रीडा क्षेत्रात आपल्यातील कलागुणांनी सर्वोत्तम कामगिरीचा नजराणा पेश करत आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उज्ज्वल करणाऱयांचा भारत सरकारकडून दरवर्षी पद्म पुरस्कारांनी सन्मान करण्यात येतो. भारतीय संघाचा युवा कर्णधार विराट कोहली याने गेल्या काही वर्षात क्रिकेट विश्वात आपल्या दमदार कामगिरीने आपली वेगळी ओळख निर्माण केली. कोहलीच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्ध शानदार विजय साजरा केला. याशिवाय, कोहलीच्या नेतृत्त्वात भारतीय कसोटी संघाने क्रमवारीत अव्वल स्थान देखील कायम ठेवले. विराटने आपल्या वैयक्तिक कामगिरीनेही देशाचे नाव उंचावले आहे. गेल्या वर्षभरात सर्वाधिक धावा करणाऱयांच्या यादीत कोहली अव्वल होता. कोहलीच्या या कामगिरीची दखल घेत त्याला पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

Comments Login For Comment

  • No Comments

Related News