News Details

प्रजासत्ताकदिनी भारतीय संघ विजयी योग साधणार?
Posted By : Shweta   ,   Posted On : 2017-01-26 10:07:50

कानपूर : कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत इंग्लंडवर वर्चस्व गाजवल्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ आता ट्वेन्टी-२० प्रकारात प्रभुत्व सिद्ध करण्यासाठी सज्ज झाला आहे. कानपूरच्या छोटेखानी मैदानावर पाहुण्या इंग्लंड संघाला चीतपट करण्यासाठी भारतीय संघ आतुर आहे. दुसरीकडे चार कसोटी आणि दोन एकदिवसीय सामन्यांनंतर इंग्लंडने विजय मिळवला. हा विजयी सूर कायम राखण्यासाठी इंग्लंडचा संघ प्रयत्नशील आहे. भारताने एकदिवसीय संघात सहा बदल केले आहेत. नियमित फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना विश्रांती देण्यात आली आहे. यामुळे अमित मिश्राचे संघातील स्थान पक्के झाले आहे. दुसऱ्या फिरकीपटूच्या स्थानासाठी परवेझ रसूल आणि युझवेंद्र चहल यांच्यात चुरस आहे. इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादसाठी दिमाखदार प्रदर्शन करणारा ३७ वर्षीय आशीष नेहरा हुकमी एक्का ठरू शकतो. जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांच्यात एका जागेसाठी शर्यत आहे. संघ भारत : विराट कोहली (कर्णधार), जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल, महेंद्रसिंग धोनी, भुवनेश्वर कुमार, मनदीप सिंग, अमित मिश्रा, आशीष नेहरा, मनीष पांडे, हार्दिक पंडय़ा, ऋषभ पंत, परवेझ रसूल, लोकेश राहुल, युवराज सिंग, सुरेश रैना. इंग्लंड : इऑन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जेक बॉल, सॅम बिलिंग्ज, जोस बटलर, लियाम डॉसन, जॉनी बेअरस्टो, ख्रिस जॉर्डन, टायमल मिल्स, लियाम प्लंकेट, आदिल रशीद, जो रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, डेव्हिड विली.

Comments Login For Comment

  • No Comments

Related News