News Details

अकोल्याच्या हापकिडोपटूंची भारतीय संघात वर्णी
Posted By : Shweta   ,   Posted On : 2017-04-25 19:38:12

अकोला : भूतान येथे २८ एप्रिल ते १ मे या कालावधीत हापकिडो बॉक्सिंग स्पर्धा होणार असून, या स्पर्धेसाठी निवड झालेल्या भारतीय संघात येथील युथ कराटे अ‍ॅन्ड डिफेन्स क्लबमध्ये प्रशिक्षण घेतलेले साहिल गोखले व प्रियंका इंगळे या खेळाडूंची वर्णी लागली आहे. हापकिडो बॉक्सिंग असोसिएशन अंतर्गत कर्जत येथे पार पडलेल्या राष्ट्रीय हापकिडो बॉक्सिंग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून या दोघांनी भारतीय संघात स्थान मिळविले आहे. हापकिडो बॉक्सिंग असोसिएशन, भूतान अंतर्गत येत्या २८ एप्रिल ते १ मे या कालावधीत भूतान येथे स्पर्धा खेळविल्या जाणार आहे. या स्पर्धेत भारताच्या संघात निवड झालेल्या खेळाडूंमध्ये साहिल गोखले व प्रियंका इंगळे यांचा समावेश आहे. या खेळाडूंना युथ कराटे अ‍ॅन्ड डिफेन्स क्लबचे सचिव तथा प्रशिक्षक मनोज अंबेरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

Comments Login For Comment

  • No Comments