News Details

9 वर्षाची चिमुरडी अंडर 19 च्या संघात
Posted By : Shweta   ,   Posted On : 2017-04-25 19:32:36

Description : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वयाच्या 16 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. पदार्पणातच त्यांने गोलंदाजांची पिसे काढत क्रिकेटमध्ये वय महत्वाचे नसून प्रतिभा महत्वाची असते हे दाखवून दिले होते. असाच आणखी एक प्रकार भारताचा महिला क्रिकेटमध्ये घडला आहे. आज महिलाच्या अंडर-19 संघाची निवड झाली आहे. यामध्ये चक्क नऊ वर्षाच्या अनादि तागडेची निवड करण्यात आली आहे. मूर्ती लहान पण किर्ती महान असं आपण अनेकदा म्हणतो... तेच आपल्याला सध्या ह्या चिमुकलीबद्दल म्हणावं लागेल. मध्यप्रदेशातल्या इंदौरमधील अनादि तागडेने क्रिकेटच्या जगात आपला इतिहास रचला आहे. या नऊ वर्षाच्या अनादिची अंडर- 19 महिला क्रिकेटमध्ये निवड झाली आहे. चौथीमध्ये शिकणारी अनादि वेगवान गोलंदाजही आहे. तिची गोलंदाजी बघून निवडकर्तेही हैरान झाले होते. तिची कामगिरी बघून एवढ्या लहान वयातही तिची निवड करण्यात आली.

Comments Login For Comment

  • No Comments

Related News