News Details

मुंबईत राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा
Posted By : Shweta   ,   Posted On : 2017-03-22 15:06:24

Description : मुंबई शहर कबड्डी असो.च्या विद्यमाने, महानगरपालिकेच्या सहकार्याने व महाराष्ट्र असो.च्या मान्यतेने मुंबई महापौर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय क्रीडा मंदिर, वडाळा, येथे दि.22 ते 25 मार्च या कालावधीत होणार्‍या या स्पर्धेत 16 पुरुष व्यावसायिक व 12 महिला संघांना सहभाग देण्यात आला आहे. विद्युतझोतात चार क्रीडांगणावर हे सामने खेळविले जातील. या स्पर्धेच्या निमित्ताने खेळाडूंची वैयक्‍तिक कामगिरी दर्शविणार्‍या गुणपत्रिका वापरण्याचा प्रयोग करण्यात येणार आहे. याची पूर्वतयारी म्हणून काही निवडक सामनाधिकार्‍यांना निमंत्रित करून ती कशी भरावयाची ते समजावून देण्यात आले. गतवर्षी या स्पर्धेचे विजेतेपद एअर इंडियाने महिंद्र संघाला पराभूत करून पटकाविले होते. नुकत्याच झालेल्या 9व्या औधोगिक राष्ट्रीय स्पर्धेत एअर इंडियाने महिंद्राला पराभूत करून विजेतेपद मिळविले होते. या स्पर्धेत महिंद्रा संघ त्या पराभवाचे उट्टे काढते का? की पुन्हा एकदा एअर इंडिया बाजी मारते, ते पहाणे औत्सुक्याचे ठरेल. गतवर्षी महिला विभागात शिवशक्‍तीने पुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाला पराभूत करून विजेतेपदावर आपले नाव कोरले होते. या स्पर्धेत सहभागी होणार्‍या व्यावसायिक पुरुष व स्थानिक महिला संघाची चार-चार गटात विभागणी करण्यात आली. ती प्रसिद्धी माध्यमांसाठी मुंबई शहर कबड्डी असो. चे सरचिटणीस विश्वास मोरे यांनी जाहीर केली. ती खालील प्रमाणे. पुरुष गट : अ-गट : 1) एअर इंडिया, 2) महाराष्ट्र पोलीस, 3) सेंट्रल बँक, 4) मुंबई बंदर. ब-गट : 1) महिंद्रा अँड महिंद्रा, 2) बी. ई. जी., 3) मुंबई पोलीस, 4) देना बँक. क-गट : 1) नाशिक आर्मी, 2) मध्य रेल्वे, 3) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण, 4) बँक ऑफ इंडिया. ड-गट : 1) भारत पेट्रोलियम, 2) आयकर विभाग, 3) युनियन बँक, 4) मुंबई महानगर पालिका. महिला गट : अ-गट : 1)शिवशक्ती संघ, 2) छत्रपती मंडळ, 3)स्वराज्य संघ. ब-गट : 1) राजमाता जिजाऊ, 2) नवशक्ती मंडळ, 3)डॉ. शिरोडकर क्लब. क-गट : 1) संघर्ष क्रीडा मंडळ, 2) अमरहिंद मंडळ, 3) होतकरू मित्र मंडळ. ड-गट : 1) मुंबई पोलीस महिला जिमखाना, 2) महात्मा गांधी स्पोर्ट्स, 3) सुवर्णयुग मंडळ.

Comments Login For Comment

  • No Comments