News Details

राष्ट्रीय किशोर कबड्डीही आता रंगणार मॅटवर
Posted By : Shweta   ,   Posted On : 2017-03-22 14:48:08

मुंबई : भारतीय कबड्डी महासंघाने राष्ट्रीय किशोर कबड्डी स्पर्धा यंदापासून मॅटवर घेण्याचे ठरवले आहे. अर्थातच, पुढील महिन्यात तमिळनाडूत होणारी ही स्पर्धा मॅटवरच घेण्याचा अंतिम निर्णय झाला आहे. भारतीय कबड्डी महासंघाने ही स्पर्धा मॅटवर घेण्याचा निर्णय सहभागी संघांना कळवला आहे. आंतरराष्ट्रीय कबड्डी मॅटवरच होत आहे. किशोर वयातच कबड्डीपटूंना मॅटवर खेळण्याची सवय व्हायला हवी. याच उद्देशाने आम्ही ही स्पर्धा मॅटवर खेळवण्याचे ठरवले असल्याचे भारतीय कबड्डी महासंघाचे सीईओ देवराज चतुर्वेदी यांनी सांगितले.

Comments Login For Comment

  • No Comments