News Details

भारतात आता रंगणार प्रो बॉक्‍सिंगची लीग
Posted By : Shweta   ,   Posted On : 2017-03-16 10:52:28

मुंबई: भारतीय बॉक्‍सिंग महासंघाने वर्षाअखेरीस बॉक्‍सिंग लीग घेणार असल्याचे जाहीर केल्यावर काही दिवसांतच व्यावसायिक बॉक्‍सरसाठीच्या लीगची घोषणा करण्यात आली आहे. प्रो बॉक्‍सिंग इंडिया चॅंपियनशिप लीग वर्षाच्या मध्यास होईल, असे सांगण्यात येत आहे. रॉयल स्पोर्टस प्रमोशनने आशियाई बॉक्‍सिंग परिषदेच्या सहकार्याने ही लीग घेण्याचे ठरवले आहे. ही लीग आठ संघांची असेल. प्रत्येक सामना सहा लढतींचा असेल. अर्थातच प्रत्येक गटातील सर्वोत्तम बॉक्‍सर हा याचा विजेता असेल. या लीगमध्ये एकंदर 48 बॉक्‍सर असतील, त्यात 16 महिला स्पर्धक असतील. या स्पर्धेत अर्थातच परदेशी बॉक्‍सरही असतील. स्पर्धेत एकंदर सहा कोटींचे बक्षीस असेल. या लीगने देशातील व्यावसायिक बॉक्‍सिंगला चालना मिळेल, असे रॉयल स्पोर्टस प्रमोशनचे संचालक जयसिंग शेखावत यांनी सांगितले. या स्पर्धेतील विजेते आशियाई विजेतेपदासाठी पात्र ठरतील.

Comments Login For Comment

  • No Comments