News Details

सुपर लीग शालेय कबड्डी खेळाडूंची प्राथमिक निवड चाचणी 4 व 5 मार्च रोजी
Posted By : Shweta   ,   Posted On : 2017-02-24 23:27:57

Description : मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे शालेय मुलांची सुपर लीग कबड्डी स्पर्धा उन्हाळ्याच्या सुट्टीत भारतीय क्रीडा मंडळ, वडाळा येथे होणार आहे. शालेय 128 खेळाडूंची प्राथमिक निवड गेल्या महिन्यात झालेल्या हिंद करंडक स्पर्धेतून घेण्यात आली. परंतु काही अडचणींमुळे या स्पर्धेत सहभागी न झालेल्या अनेक शालेय कबड्डी खेळाडू व त्यांच्या पालकांच्या आग्रहास्तव संयोजन समितीचे प्रमुख संजय शेटे, डॉ. गो.वि. पारगावकर व गोविंदराव मोहिते यांनी त्यांना मोफत संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबई, नवी मुंबई व ठाणे परिसरातील शालेय मुलांनी सुपर लीग शालेय कबड्डी खेळाडूची प्राथमिक निवड चाचणी 4 व 5 मार्च रोजी मातीच्या क्रीडांगणावर घेण्यात येणार आहे. सुपर लीग शालेय कबड्डी खेळाडूची प्राथमिक निवड होऊ इच्छिणार्या इयत्ता नववीपर्यंतच्या मुलांनी 4 मार्च रोजी दुपारी 3.30 वा. मुंबई शारीरक शिक्षण मंडळाचे भारतीय क्रीडा मंदिर-मैदान, नायगाव-वडाळा क्रॉस रोड, वडाळा, मुंबई येथे शाळेचे ओळखपत्र व कबड्डी गणवेशासह उपस्थित राहणे, आवश्यक आहे. त्यानंतर सुपर लीग शालेय कबड्डी संघांच्या अंतिम निवडीसाठी कोणत्याही खेळाडूचा विचार केला जाणार नाही. तसेच गेल्या महिन्यात झालेल्या हिंद करंडक स्पर्धेदरम्यान निवड झालेल्या अधिकृत पत्रधारक खेळाडूना यावेळी उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. सदरबाबत अधिक माहितीसाठी तसेच विनाशुल्क नांवे नोंदणीसाठी विख्यात प्रशिक्षक भारत संधाने (9768548448), सचिन आयरे (9820817749), बंडू कांबळे (9867724877) यांच्याकडे 25 फेब्रुवारीपर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments Login For Comment

  • No Comments