News Details

मार्चमध्ये शालेय कबड्डी लीगची निवड चाचणी
Posted By : Shweta   ,   Posted On : 2017-02-22 09:25:03

मुंबई: मुंबई व नवी मुंबईतील शालेय खेळाडूंसाठी सुपर लीग कबड्डी स्पर्धेच्या प्राथमिक निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे़ वडाळा, क्रॉस रोड येथील मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाच्या भारतीय क्रीडा मैदानात ४ व ५ मार्च रोजी ही निवडचाचणी पार पडणार आहे. मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाच्या वतीने शालेय स्तरावर कबड्डी रुजवण्यासाठी उन्हाळ्याच्या सुट्टीत सुपर लीगचे आयोजन करण्यात येणार आहे. लीगमध्ये इयत्ता नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल़ इच्छुक खेळाडूंनी ४ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजता शाळेचे ओळखपत्र आणि कबड्डी गणवेशासह क्रीडांगणावर उपस्थित राहाणे आवश्यक आहे. नुकत्याच पार पडलेल्या हिंद करंडक स्पर्धेतून शालेय सुपर लिगसाठी १२८ कबड्डीपटूंची निवड करण्यात आली होती. काही कारणास्तव हिंद करंडक स्पर्धेत सहभागी न झालेल्या शाळांसाठी शेवटची संधी देण्याचा निर्णय संयोजन समितीने घेतला. यासाठी ४ व ५ मार्च रोजी पुन्हा प्राथमिक निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे़ या चाचणीनंतर संघ निवडीसाठी अन्य कोणत्याही खेळाडूचा विचार करण्यात येणार नाही.

Comments Login For Comment

  • No Comments