News Details

मुंबई श्री’ची रंगत २५ फेब्रुवारीला
Posted By : Shweta   ,   Posted On : 2017-02-22 09:17:28

मुंबई: अत्यंत प्रतिष्ठेची असलेली ‘मुंबई श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धेची चुरस २५ फेब्रुवारीला अंधेरी येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथे रंगणार आहे. विशेष म्हणजे मुंबईतील महापालिका निवडणूकीमुळे शरीसौष्ठव स्पर्धेला आर्थिक पाठिंबा देणारे अनेक राजकीय पुरस्कर्ते यंदा दूर राहिल्यानंतर या स्पर्धेत खेळाडूंवरील बक्षिसांची रक्कम कमी होणार नसल्याची माहिती स्पर्धा आयोजकांनी दिली. त्यामुळेच मुंबईतील सर्वच प्रमुख शरीरसौष्ठवपटूंनी मुंबई श्रीचा किताब पटकावण्यासाठी कंबर कसली आहे. बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित होत असलेली ‘मुंबई श्री’ स्पर्धा देशातील सर्वात श्रीमंत जिल्हा स्पर्धा असून यातून शरीरसौष्ठवपटूंना घसघसीत कमाई करण्याची संधी आहेच, त्याचबरोबर या स्पर्धेतूनच आगामी ‘महाराष्ट्र श्री’ स्पर्धेसाठी मुंबईच्या संघाची निवड होणार आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी मुंबईच्या दोन संघांची निवड होणार असल्याने शरीरसौष्ठवपटूंमध्ये कडवी चुरस पहायला मिळेल. ‘मुंबई श्री’ पटकावण्यासाठी जबरदस्त टक्कर होणार असून सुनीत जाधव, सागर कातुर्डे, स्वप्नील नरवडकर, प्रमोद सिंग आणि नितीन म्हात्रे हे आंतरराष्ट्रीयस्तराचे शरीरसौष्ठवपटूंमधील लढत लक्षवेधी ठरेल. मुळात या बलाढ्य खेळाडूंचे लक्ष्य महाराष्ट्र श्री स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचे असून अनेकदा जेतेपद हातातून निसटलेला प्रतिक पांचाळ, संतोष भरणकर, श्रीनिवास खारवी, अरुण नेवरेकर, विलास घडवले, सकिंदर सिंग, श्रीदीप गावडे, आशिष काळोखे आणि निलेश दगडे यांसारखे अनेक खेळाडू किताब पटकावण्यासाठी आव्हान निर्माण करतील.

Comments Login For Comment

  • No Comments