News Details

विश्वचषक आयोजनाची भारताकडे क्षमता
Posted By : Shweta   ,   Posted On : 2017-02-11 12:48:08

Description : आशियाई ट्रॅक अजिंक्यपद स्पध्रेत यजमान भारताला अपयश आले असले तरी भविष्यात भारतात विश्वचषक मालिका आणि विश्व अजिंक्यपद स्पर्धा होऊ शकतील, असे सूतोवाच जागतिक सायकल महासंघाचे प्रमुख ब्रायन कुकसन यांनी केले. नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी स्टेडियममधील सायकलींच्या शर्यतीसाठी असलेले रिंगण (वेलोड्रम) हे जागतिक दर्जाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. ते म्हणाले, ‘भारतात महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धाचे आयोजन होऊ शकते का, याबाबत मी भारतीय सायकलिंग महासंघातील (सीएफआय) काही मित्रांशी चर्चा करत होतो. या स्पर्धामध्ये विश्वचषक मालिकेचा समावेश असू शकतो. जागतिक दर्जाची स्पर्धा येथे आयोजित न करण्यामागे कोणतेच कारण नाही. भविष्यात विश्व अजिंक्यपद स्पर्धाही येथे आयोजित केली जाऊ शकते. हे सर्व काही शक्य आहे. त्यादृष्टीने आम्ही पाऊल उचलणार आहोत.’ सायकलिंगमध्ये जास्त प्रमाणात उत्तेजक सेवनाची प्रकरणे आढळतात, त्याबाबत कुकसन म्हणाले की, ‘उत्तेजक सेवनाचा खेळ अशी प्रतिमा हळूहळू नाहीशी होत चालली आहे. आता उत्तेजकविरुद्ध लढणारा खेळ अशी आमची ओळख निर्माण झाली आहे. चुकांमधून आम्ही बरेच काही शिकलो आहोत. अनेक राष्ट्रीय उत्तेजकविरोधी संस्थां आमच्याशी संलग्न आहेत. त्यामुळे गमावलेला विश्वास आम्ही पुन्हा कमवला आहे.’

Comments Login For Comment

  • No Comments